सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर भरदिवसा तिच्याच घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरात एकटी असताना, ४८ वर्षीय आरोपी इसमाने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्याने सुरुवातीला महिलेसोबत धक्काबुक्की केली आणि "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत तिला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेले. महिलेने विरोध करताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर पीडितेने घाबरून जाऊन आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला धमकी दिली की, "घडलेली घटना जर कोणाला सांगितली, तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलाला जिवंत ठेवणार नाही." या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने काही वेळानंतर आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला. दोघांनी मिळून तात्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
0 Comments