सोलापूर | शिंदे गटाला मोठा झटका; तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंतांचा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा



शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्हात मोठा धक्का बसला. आमदार तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंतानी पक्ष पदाचा राजीनामा सोपवला. गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीराव सावंत हे जिल्हा संपर्क पदावर कार्यरत होते. पण त्यांचे पक्षाशी सूर जुळले नसल्याचे समोर आले. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सावंत यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील निर्णयात विश्वासात घेत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी याविषयीची तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठीकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली नसल्याने सावंतानी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या अनेक समर्थकांनी सुद्धा राजीनामे दिले आहेत.

Post a Comment

0 Comments