प्रतिकूल परिस्थितीत झगडलेल्या युवकाच्या जिद्दीची कहाणी डॉ समाधान पवार यांच्या संघर्षावर टाकलेला प्रकाश


✒️- अर्जुन रामहरी गोडगे

हि गोष्ट आहे डॉ समाधान पवार यांची. तस पाहिलं सरांचं बालपण परंडा तालुक्यातील वाकडी छोट्याशा खेडेगावी गेले, पहिली ते दहावी शिक्षण हि गावातील शाळेतच झाले. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्राच्या बॉण्ड्री वरील गाव म्हणून वाकडी गावाची ओळख. दहावीपर्यंत शिक्षण गावातच झाले त्यानंतर अकरावी-बारावी शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये झाले. त्यानंतर बीएससी भाऊसाहेब झाडबुके कॉलेज बार्शी मधून पूर्ण झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, तुटपुंजे शेती अशा हलाखीच्या परिस्थितीत त्यांचा संघर्ष चालू होता. 

समाधान पवार यांनी शिक्षणातील चुणूक दाखवली, बीएस्सी बीएससी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती यामुळे बीएस्सी नंतर काहीतरी नोकरी करू आणि आपल्या आई-वडिलांना सुखी ठेवू असा निर्णय घेतला, काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला व पुण्यामध्ये केमिकल फॅक्टरी नोकरीला लागले. एक वर्ष काम केल्याबरोबर खाजगी क्षेत्रातील पिळवणूक व मानसिक त्रास याचाही त्यांना प्रत्यय आला, एक वर्षांच्या विश्रांतीनंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे एमएससी साठी प्रवेश घेतला. काम काम करताना होणारी पिळवणूक व आर्थिक ससेहोलपट पाहून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
एम.एस.सी ची दोन वर्ष अत्यंत परिश्रम घेऊन चिकाटीने अभ्यास केला, त्या दोन वर्षाच्या परिश्रमावर समाधान पवार हे जी आर एफ नेट उत्तीर्ण होणारे बहुधा शिवाजी विद्यापीठातील पहिलेच विद्यार्थी असावेत. महाराष्ट्रातील  नामांकित अशा रयत शिक्षण संस्थेमध्ये पाहिल्यास मुलाखतीमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून निवड झाली. निवड झाल्यानंतर ही त्यांनी शिक्षण चालू ठेवले शिवाजी विद्यापीठामध्ये "फोटो फिजिकल स्टडीज ऑफ सेमीकण्डक्टींग नॅनो मटेरियल्स अँड देअर एनालिटिकल एप्लिकेशन्स" या विषयामध्ये डॉ. जे. बी. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पीएचडीचा प्रबंध पूर्ण केला. सरांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वर्कशॉप,सेमिनार यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे. १५  शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिश झाले आहेत.

आपल्या अध्ययन व अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून एक अभ्यासू व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी आपली ओळख निर्माण केली.विद्यार्थ्यांचं मन  मनगट आणि मेंदू बळकट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं व्यक्तिमत्त्व तयार करणे, स्वतःसाठी व समाजासाठी त्याचा उपयोग करणे याची शिकवण पवार सरांनी विद्यार्थ्यांना दिली. 
आपण आपल्या परिस्थितीचं नुसतं भांडवल करत बसलो तर यश मिळणार नाही. जिद्द, चिकाटी, मेहनत व परिस्थिती यांचा मेळ घेतला तर यश तुम्हांला कधीच हुलकावणी देत नाही. आलेल्या परिस्थितीशी जोमाने सामोरे गेले पाहिजे, असे मत डॉ समाधान पवार यांनी बोलताना व्यक्त केले.

त्यांच्या यशामध्ये स्वर्गीय मातोश्री, वडील प्रकाश पाटील, भाऊ व पत्नी यांचा मोलाचा वाटा आहे, प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत सरांनी केलेले घोडदौड निश्चितच वाकडी गावाची मान उंचावणारी आहे, डॉ. समाधान पवार यांच्या संघर्षाला लोकवार्ता न्यूज कडून मानाचा सलाम!

Post a Comment

6 Comments

  1. खूप छान लेखन

    ReplyDelete
  2. सर .. खूप हुषार तर आहेतच पण एक आदर्श व्यक्ती सूद्धा आहेत. खूपच छान... खूप प्रोत्चाहन देनारा प्रवास आहे. नक्कीच, हा लेख वाचून अनेकांना ऊर्जा मिळेल.

    ReplyDelete
  3. Thank you Arjun (Nana) godge for publishing my journey in your online news channel. 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete