भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे त्यानंतर नताशा आपल्या मुलासह सर्बियाला परतली आहे. या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या कठीण काळातून जात आहे.
T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने याबाबत भाष्यही केले होते. आता काही दिवसांपूर्वी या दोघांनीही घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानंतर आता हार्दिकचे नाव एका 25 वर्षीय अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. अलीकडेच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नात दोघेही एकत्र दिसले होते त्यामुळे त्याच्या नात्याबाबत चर्चा रंगली आहे.
हार्दिक या अभिनेत्रीच्या प्रेमात?
हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांच्यातील जवळीक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच हार्दिक पांड्याने अनन्या पांडेला इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे, त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे दोघे अनंत आणि राधिकाच्या लग्नात एकत्र आले होते. या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांनीही एकत्र डान्स केला होता. मात्र या दोघांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
0 Comments