गर्भपात करताना मृत्यू, मृतदेहासह दोन जिवंत मुलांना नदीत फेकले


पुणे |

मावळमधून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. अनैतिक संबंधातून प्रेग्नंट राहिलेल्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. नंतर त्या महिलेच्या मृतदेहाची इंद्रायणीच्या पात्रात विल्हेवाट लावण्यात आली. त्यावेळी आरडाओरड करणाऱ्या तिच्या मुलांनाही इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे.

राज्याला हादरवून सोडणारी ही घटना पुण्यातल्या मावळात घडली आहे. तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अनैतिक संबंधामुळे गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला होता.

या घटनेतील आरोपीने शिताफीने इंद्रायणीच्या पात्रात महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी महिलेच्या दोन्ही मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे त्या मुलांना आरोपीने नदीतमध्ये फेकून दिलं.

या धक्कादायक घटनेनंतर आंबी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. पोलिस आरोपीच्या शोधात असून घटनेचा कसून तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments