बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची झालेली अवस्था चौथी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. तालुक्यातील तडवळे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता चौथी शिकणाऱ्या आरुषीने सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहून व्यथा मांडल्या आहेत. तळवळे गावच्या जिल्हा परिषद शाळेत 44 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. जिल्हा परिषद असणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे आरुषणी आपल्या पत्राच्या माध्यमातून पोटतिडकीने अनेक समस्यांची जाणीव करून दिली आहे..
इयत्ता चौथी मध्ये शिकणारी चिमुकली आरुषी किरण पवार रोज न चुकता शाळेत येते. मात्र शाळेत आल्यानंतर सुविधांचा वनवा दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत दुरवस्था झाली आहे. वाऱ्यामुळे हालणारे पत्रे अशा अनेक समस्यांचा उल्लेख केला आहे. शाळेच्या आवारामध्ये पिण्याचा पाण्याची सोय नसणे.ज्या वयात पत्रलेखन शिकायचे त्या वयात पत्राद्वारेच समस्या मांडायची जबाबदारी ही चिमुकली पार पाडत आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावातील असणारी प्राथमिक शाळेची इमारतीची निगा राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग किंवा ग्रामपंचायतीची आहे. मात्र जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत विभागांनी या न त्या कारणावरून बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसून येतात. शाळा बंद पडू नयेत म्हणून ग्रामस्थांनी आपले आद्य कर्तव्य समजून पुढे येणे गरजेचे आहे तरच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे शिक्षण सक्षमपणे पूर्ण करता येऊ शकेल.
0 Comments