सुरेश डिसले यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान


राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणवंत शिक्षक आणि शाळांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पुणे विभाग शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, अध्यक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे ,आय आर एस विपुल वाघमारे उपस्थित होते. 
महाराष्ट्र विद्यालय बार्शी या शाळेतील सतत क्रियाशील असलेले सुरेश डिसले सरांना गुणवंत शिक्षक पुरस्कार  देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारताना डिसले सरांचा परिवार उपस्थित होतो.
गुणवंत शिक्षक पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव , एस.बी. शेळवणे,सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments