शेतकऱ्यांना लुटणारे कारखानदार सुळावर चढवा : शंकर गायकवाड


सोलापूर |

दि.२३ऑगस्ट २०२४ राज्यभरातील बहुसंख्य साखर कारखानदार शेतकऱ्यांना एफ.आर.पी. अधिक व्याजासह नफा अशी कायदेशीर पद्धतीने ऊस बिले न देता शेतकऱ्यांना लुटत आहेत. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकवलेली असल्यामुळे, आज आम्ही सोलापूर साखर सहसंचालक येथे आलो असता ते गैरहजर असल्यामुळे कार्यालयात त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन बोंबाबोंब आंदोलन केले असल्याचे सांगून, असे शेतकऱ्यांना लुटणारे व शेतकऱ्यांचे रक्त पिऊन निगरगट्ट झालेल्या साखर कारखानदार सुळावर चढवा.

अशी घनाघाती टीका व मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आज सोलापूर येथील विभागीय साखर सहसंचालक कार्यालय येथे झालेल्या बोंबाबोंब आंदोलनातून केली तसेच राज्यातील शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिले लवकरच न दिल्यास पुणे येथील साखर आयुक्त यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिला. 
  
त्यावेळी गणेश मोरे, अमोल लोंढे, आतिश लोंढे, शंकर डोईफोडे, समर्थ डोईफोडे, कुमार फोपले बाबासाहेब फोपले, नवनाथ आगलावे, परमेश्वर सातपुते, दादासाहेब आगलावे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments