सोलापूर |
शास्त्रीनगरच्या मोहसीन नदाफ उर्फ डिके याच्याविरुद्ध 10 हजार रुपयांची खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे (वय 33, राहणार शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन वाघमारे आणि त्यांचे मित्र आयाज शेख यांनी संत तुकाराम चौकाजवळ रिमझिम बारच्या समोर नवा पान टपरी व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर मोहसीन नदाफ उर्फ डिके यांनी त्यांना धमकावत म्हटले की, "तू इधर नई पान टपरी सुरू किया है ना.. तो तुझे इधर के नियम मालूम नहीं है क्या... तुझे अगर इधर पान टपरी सुरू रखना है तो... हर महिना दस हजार रुपये हप्ता देना पडेगा... इधर के सब लोग मुझे हप्ता देते.. तेरे को भी देना पडेगा.. तू अगर मुझे हप्ता नही दिया तो... मै तेरे हातपाव तोडके तुझे तेरे घर वालो को घर मे घुसके खल्लास कर दुंगा... तू इधर धंदा कैसे कर सकता है.." अशा धमक्या देऊन बेकायदेशीररित्या हप्त्याची मागणी केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अर्जुन अशोक वाघमारे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मोहसीन नदाफ उर्फ डिके याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 308 (2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मोरे करत आहेत.
0 Comments