मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आलीये. ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. 03 जून रोजी मध्यरात्री 3 वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, मंत्रालयासमोरील एका इमारतीवरुन तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? हे स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिलेली आहे.
IAS अधिकारी विकास रस्तोगी यांची मुलगी लीपी रस्तोगीने 03 जून रोजी मध्यरात्री मंत्रालयालसमोरील (Mumbai News) सुनीती या इमारतीवरुन उडी मारली. आत्महत्या केल्यानंतर लीपी खाली उभी असलेल्या एका मोटरसाईकल वर कोसाळली. जीवन संपवण्याआधी तिने एक चिठ्ठी देखील लिहिली होती.
समोर आलेल्या माहितीनूसार मृत मुलगी ही 27 वर्षांची असून ती LLB चे शिक्षण घेत होती. शिवाय आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिल्याचं म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीच्या 10 व्या मजल्यावरुन अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments