श्रीस्वामिनारायण मंदिर बार्शी यांच्या वतीने यूपीएससी तज्ञ द्विवेदी सर यांचे विशेष मोफत करिअर मार्गदर्शन सत्र


भगवान स्वामीनारायण आणि गुरुदेव महंत स्वामी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिर, बार्शी यांच्या वतीने एक विशेष मोफत करिअर मार्गदर्शन सत्र (CAREER GUIDANCE SEMINAR) आयोजित करण्यात येत आहे — “CRAFTING CAREER FOR VIKSIT BHARAT”

आजच्या स्पर्धात्मक काळात योग्य दिशा, योग्य रणनीती आणि अनुभवी मार्गदर्शन हे यशाचे मुख्य घटक आहेत. शैक्षणिक स्पर्धात्मकतेत पुढे जाणे आणि देशाला विकसित भारत बनविण्याच्या ध्येयाने बीएपीएस संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे. अनेक तरुणांनी या उपक्रमांद्वारे सर्वांगीण माहिती आणि प्रेरणा मिळवून या सेमिनारचा लाभ घेतला आहे.

या प्रसंगी सत्राचे मार्गदर्शन बी.ए.पी.एस. प्रमुख अकॅडमी, बडोदाचे कोऑर्डिनेटर आणि यूपीएससी तज्ञ श्री दिवस द्विवेदी सर करणार आहेत. अकॅडमी विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित आहे जे भविष्यात अधिकारी बनून समाज आणि राष्ट्राची सेवा करू इच्छितात. अकॅडमी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, उत्तम रणनीती आणि मूल्याधारित शिक्षण देऊन त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाकडे नेण्याचा प्रयत्न करते. पुढे जाण्याची प्रेरणा देणे हेच या सत्राचे उद्दिष्ट आहे. या सत्रात विद्यार्थ्यांसोबत खालील विषयांवर अनुभव आणि मार्गदर्शन दिले जाईल ज्यामध्ये अनुभवांची देवाणघेवाण तसेच महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चा, करिअर निवडीची समज, सिव्हिल सर्व्हिसेस किंवा प्रायव्हेट नोकरी, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची रणनीती, यशाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आणि प्रभावी पद्धत, जीवनात मूल्ये, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीची भावना, इत्यादी. 

हे सत्र विद्यार्थ्यांना प्रेरणा, दिशा आणि आत्मविश्वास देणारे ठरेल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की या महत्त्वपूर्ण करिअर मार्गदर्शन सत्रात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे अवाहन श्रीस्वामिनारायण मंदिर बार्शी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
हे मार्गदर्शन सत्र रविवार, दिनांक २२ मार्च, २०२६ रोजी संध्याकाळी ८.०० वाजता गुजराथी शाळा, भवानी पेठ, सोलापूर रोड, बार्शी याठिकाणी संपन्न होत आहे.

Post a Comment

0 Comments