धक्कादायक ! बियरपासून अल्पवयीन तरुणीवर अत्याचारकल्याण पूर्वेत एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे गुरुवारी अपहरण करून तिला एका ढाब्यावर बिअर पाजली. नंतर तिला एका निर्जन ठिकाणी असलेल्या इमारतीच्या भागात नेऊन तिच्यावर आशीष पांडे या इसमाने लैंगिक अत्याचार केला.या प्रकरणी आशीष पांडे, त्याचा साथीदार अभिषेक डेरे यांच्यावर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

या प्रकरणात यापूर्वी लैंगिक अत्याचार प्रकरणाचा आरोप असलेला आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाचा उल्लेख तक्रारदार कुटुंबीयांनी एक दृश्यध्वनी चित्रफितीत केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या माजी नगरसेवकाने मात्र आपल्याला बदनाम करण्यासाठी काही मंडळी हे कुटील डाव रचत आहेत, असा खुलासा माध्यमांकडे केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले, न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार डेरे याचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments