नागनाथ चोबे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान


सिरसाव |

नागनाथ चोबे यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळवल्यामुळे सिरसाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला‌‌. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथील राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या नागनाथ चोबे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्राप्त झाली आहे. चोबे यांनी 'महाराष्ट्रातील भूमिपुत्राचे राजकारण: विशेष संदर्भ मुंबई' या विषयांमध्ये पाटण येथील प्राचार्य बाळासाहेब देसाई पाटण कॉलेजचे डॉ. शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनात शिवाजी विद्यापीठात शोधनिबंध सादर केला.

या संशोधन विषयांमध्ये संशोधन करत असताना मुंबईमधील परप्रांतीयांचा प्रश्न आणि आणि त्या प्रश्नावर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांकडून केलं जाणार राजकारण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच परप्रांतीयांच्या स्थलांतरामधून महाराष्ट्रामध्ये (विशेषतः मुंबईमध्ये) निर्माण झालेले सामाजिक, आर्थिक, भाषिक आणि सांस्कृतिक प्रश्न सुद्धा या संशोधनातून समोर आणलेले आहेत. या प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केल्यास भविष्यामध्ये हा प्रश्न कसे गंभीर स्वरूप धारण करू शकतो याबरोबरच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यांची सविस्तर मांडणी संशोधन विषयांमध्ये करण्यात आलेली आहे.

चोबे यांना पीएचडी पदवी मिळाल्यामुळे सिरसाव येथील ग्रामस्थांच्या वतीने यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी रामचंद्र चोबे, मुख्याध्यापक ज्योतीराम पाटील, रामेश्वर देवराम यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments