अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, एकही जागा जिंकणार नाही!


 लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर अखेर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. कोणाला किती जागा मिळतील याचा अंदाज समोर आला आहे. मात्र या एक्झिट पोलवरून सर्वात मोठा धक्का अजित पवार गटाला बसणार असल्याचं दिसतंय.

अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. मविआच्या 23 जागांमधील सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सर्वाधिक 9 जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला 9 आणि शरद पवार यांना 6 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र यावरून एक स्पष्ट होत आहे की अजित पवारांचं बंड जनतेला काही रूचलेलं दिसलं नाही.

शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 4 जागा मिळतील. तर ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असं दिसत आहे. इतकंच काय शिंदेचा गड असलेल्या ठाण्यातही ठाकरे गटाचं वर्चस्व दिसत आहे. ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर दिसत आहेत. हा एकनाथ शिंदेसाठी मोठा मानला जात आहे.

गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले होते. शिवसेना फुटल्यानंतर त्यापैकी 13 खासदार हे त्यांना सोडून गेले, तर पाच खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले. यंदा उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत उद्धव ठाकरेंना 9 जागांचा तोटा होणार असं सांगितलं जातंय.

Post a Comment

0 Comments