वैराग |
तळ्यातील गाळ उपसायचा नाही म्हणत जवळगाव मध्यम प्रकल्पामध्ये पिस्तूल मधून गोळ्या जाणण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची फिर्याद रोहन संतोष शिंदे रा. सारोळे यांनी वैराग पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी रात्री १.१५ वा. चे सुमारास जवळगाव मध्यम प्रकल्प मौजे जवळगाव, ता. बार्शी येथे फिर्यादी हे गाळ उपसण्याचे काम करीत असताना प्रकाश जाधवर, रा. मिर्झनपूर, विजय गंभीरे, व रवी (पूर्ण नाव माहित नाही) दोघे रा. पुणे हे तिघे मोटार क्र. ए. पी. २६ बीबी ६१११ गाडीमधुन उतरुन फिर्यादी यांच्याजवळ आले. तलावातील गाळ काढु नको असे बोलून आमच्या गाड्या बंद करुन गाळ उपसा करण्याचे काम बंद केले तेव्हा त्या तिघांना मी तहसिलदार यांची परवानगी घेवुन गाळ काढत आहे, असे म्हणालो असता त्यांच्यातील विजय गंभीरे याने त्याच्या गाडीतील पिस्टल हातात घेवुन दमदाटी करीत म्हणाला की, तलावातील गाळ कोणालाच काढु देणार नाही असे बोलुन त्याने त्याचे हातातील पिस्टल हवेत वर धरुन एक गोळी झाडली व प्रकाश जाधवर, व रवी (पूर्ण नाव माहित नाही) तुला बघुन घेतो असे बोलून तेथुन निघुन गेले. तिघा जणांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments