बीडच्या गडावर झेंडा कोण रोवणार..? बजरंग सोनवणे बाजी मारणार की पंकजा मुंडे गड राखणार


बीड |

राज्यात जातीय अस्मिता टोकदार असलेल्या जिल्ह्यामध्ये बीडचा समावेश आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे हिंसक पडसाद या जिल्ह्यात उमटले होते. गेल्या तीन दशकांपासून मराठा विरुद्ध ओबीसी भोवती बीड जिल्ह्यात राजकारण सुरु आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती. विकासाच्या प्रश्नापेक्षा जातीय जाणीवा टोकदार करणारी निवडणूक म्हणून ही निवडणूक लक्षात राहणार आहे. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या प्रमाणात 4 टक्के वाढ झालीय. मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार यावर दोन्ही बाजूंनी हिशेब सध्या केला जातोय. 

परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे धनंजय मुंडे या निवडणुकीत भाजपाच्या बाजूनं होते. मुंडे बहिण-भावांच्या एकजूटीचा मोठा फायदा भाजपाला होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी फक्त बीड हा एकमेव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडं आहे. तर इतर पाच मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत. 

Post a Comment

0 Comments