क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यूपुणे |

क्रिकेट खेळत असताना लोहगावातील एका ११ वर्षीय मुलाच्या गुप्तांगावर बॉल लागल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. अवघ्या ११ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने लोहगावावर शोककळा पसरली आहे.

शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंभू हा सहावीमध्ये शिक्षण घेत होता. वार्षिक परीक्षा झाल्याने त्याला शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या होत्या. सुट्ट्यांमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद त्याच्यासह त्यांच्या कुटुंबातील भावंडासोबत घेत होता. गुरुवारी रात्री ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान तो लोहगावमधील जगद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक पुढून येणारा बॉल गुप्तांगावर लागला. त्यावेळी अचानक तो मैदानात कोसळला.

Post a Comment

0 Comments