निवडणुकीच्या काळात रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल


लोकसभा निवडणुकीच्या काळात कसब्याचे आमदार आणि पुणे मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन भाजपच्या विरोधात आंदोलन केले होते. याचवेळी बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व गुन्हे कलम 143, 145, 149, 188, 135 आणि लोकप्रतिनीधी अधिनियम 1951 चे कलम 126 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाचे म्हणजे, मतदानाच्या पूर्वी भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. याप्रकरणीच त्यांनी 12 मे रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले. या आंदोलनावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते ही पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी ठाण्यात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. ज्यामुळे गोंधळ निर्णय झाला. या सर्व प्रकारानंतर पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments