धनंजय मुंडेंना यांना परळीत बजरंग सोनवणे यांनी डिवचलेबीड |

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देणे, ऊसतोड कामगार आणि कारखान्यातील कामगार यांच्या कामाचे पैसे देणे ही आमची औकात आहे, असं प्रत्युत्तर बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत जाऊन दिलं.

ज्यांना वडिलांना उभे केलेले कारखाने चालविता आले नाहीत, ज्यांनी कामगार व शेतकऱ्यांचे पैसे बुडविले त्यांनी आमची औकात आणि लायकी काढणे म्हणजे चेष्टा आहे, असं बजरंग सोनवणे यांनी सुनावलं आहे. 

बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची 'औकात काय', जिल्ह्याची 'तकदीर' आणि 'तसबीर' याचा फैसला आम्ही करु, असं म्हणत सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला होता. याला बजरंग सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Post a Comment

0 Comments