आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निकाला आधीच केला मोठा दावासोलापूर |
.
राज्यात 48 जागांसाठी 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. 4 जूनला या जागांचा निकाल समोर आला आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोठा दावा केला आहे

राज्यात महाविकास आघाडीचे खासदार वाढणार असून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

भाजपलाही कळले आहे की, त्यांच्या बाजूने जनमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे खालच्या पातळीचे होत आहेत, मोदी हे काही बोलत सुटले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एक महिन्यापासून पोलरायझेशन करण्यावर भर दिला आहे. यातून त्यांना वाटलं होतं की लोक त्यांच्या बाजूने वळतील. लोकांना कळले आहे, बदल गरजेचा आहे. चार तारखेला तो दिसेल. अनेक मतदारसंघात मतदान झाल्यानंतर 24 तासात मतदान टक्केवारी वाढली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने मागणी केल्यानंतर त्याची दखल घेतली आहे. आम्हाला लोक सांगत आहेत. आम्ही मतदान केले आहे. तुम्ही आता फक्त ईव्हीएमकडे लक्ष द्या, असं विधान प्रणिती शिंदे यांनी केलं आहे

Post a Comment

0 Comments