भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला असता तर तुमच्यासारखं भाजपमध्ये पालथं पडलो असतो, ओमराजेंचा सावंतला टोला


धाराशिव |

आमच्या वरती टक्केवारीचा आरोप करणा-यांनी राज्यातील रुग्णवाहिकेत घोटाळा करुन जनतेच्या पैशावर कुणी डल्ला मारला हे जाहीर करावं असं आव्हान ओमराजे निंबाळकरांनी तानाजी सावंताना दिले.

तर दूसरीकडे सन २०१९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी काढलेल्या जाहिरनाम्यातील काेणते काम केले ते सांगा असे आव्हान आज महायुतीच्या नेत्यांनी पञकार परिषदेत केला. आराेप-प्रत्याराेपांमुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलेच ढवळू लागले आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी शिराढोण येथील सभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यातील ॲम्बुलन्स घाेटाळ्यात शेण कोणी खाल्लं जाहीर करा असे आव्हान त्यांनी दिले.

आम्ही इमानदार आहोत म्हणून तर खुट्टा खवून कुणाच्या बापाला न घाबरता इथे उभारलोय असे ओमराजेंनी नमूद केले. ते म्हणाले आमच्या वरती टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना मला एवढंच सांगायचंय की तुमच्या सारखा भ्रष्ट मार्गाने आम्ही जर पैसा कमावला असता तर आम्ही सुद्धा तुमच्यासारखे भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये पालथे पडलो असतो अशी टिप्पणी ओमराजेंनी केली.

Post a Comment

0 Comments