पुणे हादरले ! इंस्टाग्राम वरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचारसोशल मीडियामुळे दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना चंदननगर परिसरात घडली आहे. इंस्टाग्रामवर एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीची तरुणासोबत ओळख झाली . कालांतराने या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर या मुलीला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. त्या तरुणाने या मुलीला भेटायला बोलवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीने गुरुवारी (दि.16) चंदननगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. यावरुन बाब्या चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 376, 376/2/आय, पोक्सो कलम 4, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत खराडी परिसरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणीची आणि आरोपीची 2023 मध्ये इंन्स्टाग्रामवर ओळख झाली.
आरोपीने मुलीसोबत मैत्री वाढवली. त्यांच्यात संभाषण होऊ लागले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.  त्यानंतर आरोपीने पिडीत मुलीला खराडी परिसरात भेटण्यासाठी बोलवून घेतले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने चंदननगनर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments