धक्कादायक ! पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं,अन्…



 सुसंस्कृत पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. अगोदर ड्रग प्रकरण, त्यानंतर गुंडाची हत्या, गोळीबार या सर्व प्रकारामुळे पुण्यात सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. आता विकृत मानसिकतेची अत्यंत कळस गाठणारी घटना पुण्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत अतिशय धक्कादायक कृत्य केलंय. पुण्यात पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आलीये. पिंपरी चिंचवडमध्ये हे प्रकरण घडलंय.

एका 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत होता.यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलंय. दोन दिवसांपासून ते कुलूप लावलेलं होतं. अगोदर चावीचा शोध घेण्यात आला. कारण, जखमा अतिशय नाजुक होत्या. अखेर सुजन उतरल्यानंतर ते कुलुप डॉक्टरांनी कापून वेगळे केले.

पीडित महिला या वेदनामुळे विव्हळत होती. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सदर प्रकरण समोर आलं.याची पोलिसांनी गंभीर दखल घेत संबधित पती विरुद्ध भादवि 326,506 आणि 323 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली.

 माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारे हे दाम्पत्य मूळचे नेपाळमधील असून आरोपीचं नाव उपेंद्र हुडके असे आहे. तो मूळचा नेपाळमधील बाचकुट या गावातील आहे. कामानिमित्त ते पुण्यात राहण्यास आले. पती नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात सतत वाद व्हायचे.

11 मेच्या रात्री यांच्यातील वाद जास्त चिघळले. रागाच्या भरात उपेंद्र यानं पत्नीला मारहाण केली. इतकंच नाही तर, निर्दयीपणे त्याने पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला खिळे ठोकले. पितळेचे कुलुप लावून फरार झाला. पोलिसी पेशात काम करत असताना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एव्हढा विकृत गुन्हेगार कधीही पाहिला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे

Post a Comment

0 Comments