आजकाल नागरिक सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असतात. अशातच गेल्या महिन्यात सोन्यानी उसळी घेतली आहे. मात्र ग्राहकांना या महिन्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे.
जर तुम्हीही सोने चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजचे सोन्याचे दर माहित असं महत्वाचं आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,280 रुपये आहे. तसेच याच धरतीची 10 ग्राम सोन्याची मागील ट्रेडमधील किंमत 72,670 रुपये होती.
सोन्याच्या किंमतीत घट झाली असली तरी देखील चांदीने चांगलीच उसळी घेतली आहे. आजचे चांदीचे दर 85,360 रुपये प्रति किलो आहे. चांदीची मागील ट्रेडमधील किंमत 84,730 रुपये प्रतिकिलो होती. आजच्या बाजारभावामुळे चांदीने चांगलाच भाव खाल्ला आहे. तर सोन्याचे दर नरमले आहेत
0 Comments