मलायका व अर्जुनचा ब्रेकअप; मलायका सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरलमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर  काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र आता त्यांच्यात दुरावा आला असून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. वयातील अंतरामुळे ते कायम ट्रोल झालेत.

मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. शिवाय तिला २१ वर्षांचा एक मुलगाही आहे. दोघांनी आपसी सहमतीने नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेकअपनंतर मलायकाने आज सकाळीच केलेली पोस्ट आता व्हायरल होत आहे.

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुनचे मार्ग आता वेगळे आहेत. मात्र त्यांच्यात कायम आदराची भावना असेल. तसंच दोघंही एकमेकांसाठी कधीही ठाम उभे राहतील. सध्या त्यांना स्पेसची गरज आहे. ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्यास काहीसा वेळ जाईल. मलायकाच्या पोस्टवरुन ती नक्कीच दुखावली गेल्याचं जाणवतंय. मलायकाने आज सकाळीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. एक मुलगी जी काहीशी उदास आहे डोळे बंद करुन त्याच्या मिठीत आहे असा फोटो तिने शेअर केला. फोटोवर लिहिलंय की, 'या पृथ्वीवर जर सर्वात मोठा खजिना कोणता असेल तर ते म्हणजे आपल्यावर प्रेम करणारे आणि पाठिंबा देणारे लोक. या लोकांना ना विकत घेतलं जाऊ शकतं ना त्यांची जागा कोणी घेऊ शकतं. प्रत्येकाकडे अशी मोजकीच माणसं असतात."

 2018 पासून अर्जुन आणि मलायकाच्या लव्हस्टोरीची चर्चा होती. तेव्हा पहिल्यांदा दोघांनी एकत्र इव्हेंटला हजेरी लावली होती. नंतर मलायकाच्या 45व्या वाढदिवशी त्यांनी एकत्र फोटो पोस्ट करत नातं जाहीर केलं होतं. मालदीव्ह्जमधील त्यांच्या व्हॅकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी मलायकाने लेकाच्या पॉडकास्टमध्ये मात्र अर्जुनविषयी काहीही सांगितले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून दोघं एकत्रही दिसले नाहीत. त्यामुळे या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आलं. त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहते मात्र नक्कीच दुखावले आहेत.

Post a Comment

0 Comments