श्रमिक वर्गाला उध्वस्त करणाऱ्या भाजपला हटवा मशाल चिन्हाला मतदान करा : कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरेबार्शी |

कामगार कष्टीकरी वर्गाने आजपर्यंत लढून जे कामगारांचे कायदे निर्माण केले त्याला उध्वस्त करणाऱ्या भाजपाला हटवण्याचे आवाहन आयटक सोलापूर जिल्हा  अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी कामगार केंद्र बार्शी येथे एक मे कामगार दिनाच्या सभेला संबोधित करीत असताना केले.

पुढे ते म्हणाले; श्रमिकांनी आपले रक्त सांडून कित्येक वर्षांचा संघर्ष करून आपला इतिहास निर्माण केला, त्याची आठवण ठेवणे, कष्टकरी वर्गाच्या लालबावट्याच्या विचारांना लक्षात घेऊन, आजची परिस्थिती बदलली पाहिजे, देशात महागाई, बेरोजगारी, रेशनचा, शिक्षणाचा , आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, भ्रष्टाचार व  जातीय धर्मांधता याने देश पोखरून निघाला आहे, कामगारांचे कायदे मोडून कंत्राटीकरण करणे, शेतकरी आत्महत्या, दलित अत्याचार भाजपने वाढवले आहेत. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असा उल्लेख करून संविधानावर हल्ला केला जात आहे, त्यामुळे भाजपला हटवणे आवश्यक आहे.  या निवडणुकीत भाजपला हटवण्याची नामी संधी आली आहे. श्रमिक वर्गाला उध्वस्त करणाऱ्या भाजपला मतदान करू नका,  मशाल, तुतारी, हाताचा पंजा या पुरोगामी पक्षांच्या  चिन्हाला मतदान करा,  असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, बांधकाम कामगार , नगरपालिका कामगार संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कॉम्रेड अनिरुद्ध नखाते यांनी सूत्रसंचालन केले, कॉ.डॉ. प्रविण मस्तुद यांनी सभेला मार्गदर्शन केले, यावेळी भारत भोसले भारती मस्तुद , कॉ. ए.बी. कुलकर्णी, कॉ. लहू आगलावे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments