धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना



* 2139 मतदान केंद्र
* 20 लक्ष मतदार बजावणार मतदानाचा हक्क
* 2139 मतदान केंद्राध्यक्ष तर 2675 मतदान अधिकारी
* मतदानासाठी 2139 बँलेट युनिट
 
धाराशिव |

सात मे रोजी 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयातून मतदान केंद्रस्तरीय पथके आज 6 मे रोजी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाली.

7 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी औसा,उमरगा,तुळजापूर, उस्मानाबाद,परंडा आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात एकूण 2139 मतदान केंद्रावर 20 लक्ष 4 हजार 282 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये औसा - 307,उमरगा - 315, तुळजापूर - 406, उस्मानाबाद - 410,परंडा - 372 आणि बार्शी विधानसभा क्षेत्रातील 329 मतदान केंद्राचा यामध्ये समावेश आहे.

2139 मतदान केंद्रासाठी 2139 मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त केले असून 25 टक्के केंद्राध्यक्ष म्हणजेच 536 राखीव आहेत. एकूण 2675 मतदान केंद्राध्यक्ष असतील. या निवडणुकीसाठी  6417 मतदान अधिकारी नियुक्त केले आहे.1608 हे राखीव आहे.एकूण मतदान केंद्राध्यक्षाची संख्या 8025 आहे.मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी असे एकूण 7920 जणांची नियुक्ती करण्यात आली असून 1985 राखीव आहेत.असे एकूण 9905 मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केले आहे.

 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 2139 मतदान केंद्र राहणार असून मतदान मतदानासाठी 2139 बँलेट युनिट, 2139 कंट्रोल युनीट आणि 2139 व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे. 640 बॅलेट युनिट, 640 कंट्रोल युनिट, 855 व्ही व्ही पॅट  ह्या अतिरिक्त मशीन असतील.एकूण 2779 बँलेट युनिट,2779 कंट्रोल युनिट आणि 2994 व्ही व्ही पॅट मशीन या निवडणुकीसाठी उपलब्ध आहेत.

एकूण 2139 मतदान केंद्रापैकी 201 केंद्र पडदानशीन,प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला कर्मचारी संचालित प्रत्येकी एक मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचारी संचालित प्रत्येकी एक मतदान केंद्र, युवा कर्मचाऱ्यांचे औसा विधानसभा क्षेत्रात 5 केंद्र तर उर्वरित मतदारसंघात प्रत्येकी एक मतदान केंद्र,मॉडेल मतदान केंद्र औसा-1, उमरगा-6, तुळजापूर-9, उस्मानाबाद -13, परंडा -23 आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन मतदान केंद्र आहे.संवेदनशील मतदान केंद्र औसा -एक,उमरगा -एक, तुळजापूर -दोन,उस्मानाबाद -2, परंडा - 1 आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात आठ आहेत.

Post a Comment

0 Comments