विरोधक कितीही असले तरी प्रणिती शिंदे एकटीच खंबीर: सुशिलकुमार शिंदे



सोलापूर |

प्रणिती रात्रंदिवस मतदारसंघात फिरत आहे. ती महिला असूनही विदाऊट सेक्युरिटी जनतेत फिरते. मी तिला सेक्युरिटी घेण्याबाबत विनंती केली होती, पण तिला जनतेत राहायचंय त्यामुळे ती कोणतीही सेक्युरिटी घेत नाही आहे."असं म्हणत आनंद व्यक्त केला. तर "त्याचं हे चिन्ह आहे म्हणुन आजच्या पदयात्रेत जनता मोठ्या संख्येने दिसत आहे." माध्यमांशी बोलताना म्हणाले.

"विरोधक किती ही असले तरी प्रणिती त्यांचा सामना करु शकते. महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे. ती फक्त सामना करणार नाही तर लोकांना न्याय मिळवून देईल."असा विश्वास माजी गृहमंत्री आणि कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभाची उमेदवारी घोषित केली.त्यांच्यासाठी कॉंग्रेस नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापूरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर वडिल म्हणुन सुशीलकुमार शिंदे यांनी आनंद व्यक्त करत "प्रणिती रात्रंदिवस मतदारसंघात फिरत आहे. ती महिला असूनही विदाऊट सेक्युरिटी जनतेत फिरते. मी तिला सेक्युरिटी घेण्याबाबत विनंती केली होती, पण तिला जनतेत राहायचंय त्यामुळे ती कोणतीही सेक्युरिटी घेत नाही आहे."असं म्हणत आनंद व्यक्त केला. तर "त्याचं हे चिन्ह आहे म्हणुन आजच्या पदयात्रेत जनता मोठ्या संख्येने दिसत आहे." माध्यमांशी बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, "विरोधक किती ही असले तरी प्रणिती त्यांचा सामना करु शकते. महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे. ती फक्त सामना करणार नाही तर लोकांना न्याय मिळवून देईल."असा ही विश्वास त्यांनी दाखवला. काही दिवसांआधी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे निवडणुकीनंतर भाजपमध्ये जाणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांनी दावा केला होता. त्यांचा दावा फेटाळत "आम्ही कॉंग्रेसमध्येच राहणार "असल्याचे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदेंनी दिलं होते.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपचे आमदार राम सातपुते अशी लढत सोलापूरात होत आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments