मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग


मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग
लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी पार पडणर आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी कोल्हापुरात रस्त्याच्या डागडूजीची कामे मोठ्या करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालिकेचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर नियमांनुसार उचित कारवाई करण्याची मागणीही मुख्य निवडणुक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. 

अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले की, राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक 2024 चे कामकाज सुरू झाले आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे. देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र राजकीय पक्षांकडून त्यांचे पालन करुन नेत्यांच्या सभा सुरू असून चौथ्या टप्यातील प्रचाराची कामे सुरू आहेत.


Post a Comment

0 Comments