तू आमदार कसा होतो ते बघतो! अजित पवारांचा ओपन चॅलेंजमुंबई |

शरद पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपद देण्याबाबत असं वक्तव्य केलं होतं. यावर अजित पवारांनी अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. तू आमदारच कसा होतो ते बघतो, असे ते म्हणाले आहेत. ते गुरुवारी शिरुरमधील आढळराव पाटलांच्या प्रचारसभेत बोलत होते.

"आंबेगाव जुन्नर आणि खेड या तिघांनीही रस्ता बदलला आहे. आता फक्त शिरुर राहिलं. ज्या पद्धतीने अशोक पवारांचं काम आहे त्यामुळे ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी शिरुर मोकळं राहणार नाही," असं शरद पवार म्हणाले होते. यावरून अजित पवारांनी अशोक पवारांवर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले की, "अशोक पवार यांना साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळी तुच मंत्री होणार. त्याने कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पठ्ठ्या तू आमदारच कसा होतो ते बघतो. अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊ दिलं नाही. आता तु आमदारच कसा होतो ते बघतो," असं चॅलेंज त्यांनी दिलं.

Post a Comment

0 Comments