मुंबई |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोरल्या पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. परत मागचं पुढे म्हणतात, त्याप्रमाणेच जे-जे शिवसेनेत फूट पडल्यावर घडलं ते-ते सगळं कमी अधिक प्रमाणात राष्ट्रवादीतील फुटीनंतर घडलं.
दोन गट, आमदार-खासदारांपासून ते थेट कार्यकर्त्यांपर्यंत सर्व विभागलं गेलं. पक्षाच्या अस्तित्वाची लढाई थेट कोर्टात पोहोचली आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्या शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि त्यासोबतच पक्षाची ओळख असलेलं चिन्हही गेलं. त्यानंतर शरद पवार गटानं नव्यानं कात टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार असं त्यांच्या पक्षाचं नाव ठेवलं. तर, तुतारी पुंकणारा मनुष्य पक्षाचं चिन्ह म्हणून घोषित केलं. यंदाची लोकसभा निवडणुकही अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर आणि शरद पवारांनी नवं चिन्ह असलेल्या तुतारीवर लढवली, पण आता विधानसभेचं काय? विधानसभेला शरद पवारांकडे पुन्हा घड्याळ येणार का? यावर स्वतः शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाते अध्यक्ष शरद पवार यांनीतुतारीवर आम्ही 10 जागा लढवल्यात, पण विधान यावर मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, "आज सांगता येत नाही. लोकसभेचे निकाल कसे येताता, त्यावर ठरेल. पण आता सगळे म्हणतात, आता तुतारीच बरी. तुतारीला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. पण, याचाही गांभीर्यानं विचार करावा लागेल. कारण सभेच्या वेळी 288 मतदारसंघांचा विचार करावा लागेल. काय सोयीचं आहे, हे पाहावं लागेल."
0 Comments