मोदींचा मेडिटेशन प्लॅन बारगळणार? काँग्रेसकडून निवडणूक आयोगात तक्रार


नवी दिल्ली |

 पीएम मोदी कन्याकुमारी मेडिटेशन काँग्रेस पक्षाने 30 मे पासून कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान मोदींच्या 48 तासांच्या ध्यान कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा थेट निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप पक्षाने केला. निवडणूक प्रचार संपल्यानंतर मोदी चिंतनाच्या माध्यमातून निवडणुदरम्यान घालून दिलेली बंधने तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत काय कायदा आहे ते जाणून घेऊया.

कायदा काय सांगतो?
निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांच्या ध्यान कार्यक्रमावर निवडणूक कायद्यानुसार कोणतेही बंधन नाही. 30 मे पासून कन्याकुमारी येथील ध्यानमंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानस्थ होणार आहेत.

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 126 नुसार मतदानापूर्वी सायलंस पिरियडच्या दरम्यान सार्वजनिक सभा किंवा प्रचार करण्यास मनाई आहे. मतदान संपण्याच्या 48 तास आधी सायलंस पिरियड सुरू होतो. 1 जून रोजी होणाऱ्या अंतिम टप्प्यातील मतदानाचा शांतता कालावधी गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

याच टप्प्यात पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्येही मतदान होणार आहे. अनेक टप्प्यांत निवडणुका होत असताना निवडणूक कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत,अशी माहिती समोर आली आहे.

आयोगाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांना अशीच परवानगी दिली होती जेव्हा वाराणसीमध्ये मे महिन्यात शेवटच्या टप्प्यात मतदान होणार होते. त्यावेळी पंतप्रधान केदारनाथला ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते.
स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलेल्या ठिकाणी मोदी
गुरुवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. त्यांच्या मुक्कामासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 2 हजार पोलिसांव्यतिरिक्त विविध सुरक्षा यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांनी तयारीची चाचपणी केली. स्वामी विवेकानंदांनी ज्या ठिकाणी तीन दिवस ध्यान केले होते आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते त्याच ठिकाणी मोदी ध्यान करणार आहेत.

काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आवाहन
काँग्रेसने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की मोदींचा ध्यानधारणेचा कार्यक्रम आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याने प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणार नाही, याची काळजी घेतली जावी. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोदींचा ध्यानस्थ बसल्याचा कार्यक्रम प्रसारित झाल्यास पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं, म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments