म्हणून बॉडीगार्डने केली आत्महत्या; बच्चू कडूंनी सचिनच्या जाहीरातीवर बोट ठेवत सांगितलं कारण


मुंबई |

भारतीय क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी तैनात असलेल्या सुरक्षा पथकाचा भाग असलेल्या एका पोलीस हवालदाराने बुधवारी,15 मे रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील त्याच्या गावी आत्महत्या केली. राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) तैनात असलेल्या प्रकाश गोविंद कापडे (39) यांनी सरकारी बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून घेतली. यावर आता आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट सचिन तेंडुलकरच्या जाहीरातीवर बोट ठेवलं आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, ऑनलाइन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाली आहे. हे निषेधार्थ आणि संताप आणणारं आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा. नाही तर 6 जून शिवराज्यभिषेकदिनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 7 जून सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार, असं आव्हान बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा दिलं आहे. याआधीही बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या विरोधात आंदोलन केलं होतं.

बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जो अंगरक्षक सचिन तेंडुलकरचे प्राण वाचवण्याचे काम करत होता, त्याच अंगरक्षकाला सचिन करत असलेल्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला आहे. अंगरक्षकाला आत्महत्या करायची वेळी आली असेल तर सचिन तेंडुलकरने ही जबाबदारी उचलली पाहिजे. ज्याला भारतरत्न म्हणून आपण गौरवले, त्याच्या जाहिरातीमुळे अशी आत्महत्या करावी लागत असेल तर हे दुर्दैव आहे.

या जाहिरातप्रकरणी येत्या 30 ऑगस्टला सचिन तेंडुलकरला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावरणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, एका भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीनं कुठल्या जाहिराती कराव्यात, कुठल्या करु नयेत, याची आचारसंहिता आहे. त्यामुळे आपण सचिन तेंडुलकरला वकिलामार्फत येत्या 30 ऑगस्टला कायदेशीर नोटीस पाठवणार आहोत. त्यानंतर आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे

Post a Comment

0 Comments