उगीच मला बोलायला लावू नका, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना इशारा


पुणे |

बारामती लोकसभेसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी तर शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची लेकीसाठी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केले. तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी स्वतः त्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले. या सांगता भाषणातून अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

मविआच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पाणी अडवण्याच्या प्रश्नावरून अजित पवार गटावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या सभेत बोलतान ते म्हणाले की, कोण मायचा लाल दौंड, बारामती, इंदापूरचे पाणी आडवतो ते मी पाहते, असे काल कोणीतरी बोलले. अगं पण तिथे पाणीच नाही तर काय पाहते? अरे यांना काही माहिती नाही. आम्ही सगळी कामे करायचो, असा टोला अजित पवारांनी लगावला.

तर, या राहुल कुल यांना विचारा, किती टीएमसीची धरणे आहेत, किती पाणी पुण्याला प्यायला जाते, किती पाणी शिल्लक राहते? पाणीच शिल्लक नाही तर कोण अडवणार? अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका, असे म्हणत अजित पवार म्हणाले की, मी तर ठरवले आहे या भावकीवर बोलायचेच नाही. त्यांचे त्यांना लखलाभ. असे काही बोलले तर थोडा वेळ लोकांना बरं वाटेल, पण त्यातून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून सुनावले.

तुमच्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठी राज्याचा पैसा आणला पाहिजे, केंद्राचा पैसा आणला पाहिजे. बुडीत बंधारे बांधले पाहिजेत. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे, असे आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना केले.

नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला होता. अजित पवार यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत म्हटले की, सुनेत्रा पवार या खासदार झाल्यावर त्यांचा नवरा संसदेत पर्स घेऊन जाणार अशी टीका त्यांनी केली. मग मी बोलू का? तुम्ही संसदेत जाता तेव्हा सदानंद सुळे हे काय पर्स घेऊन येतात का मागे? आम्हाला देखील बोलता येते, पण मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल. तुम्हाला थेट मुंबई गाठावी लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून यावेळी देण्यात आला

Post a Comment

0 Comments