"आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावे लागतील!" मनोज जरांगे पाटील आक्रमक



मुंबई |

राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. आता नाव घेतले नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल. यावेळेस फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांनी दिली आहे. तसेच आता माझी तब्बेत बरी आहे, काळजी करायची गरज नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले. 

मनोज जरांगे म्हणाले,  पाच टप्प्यात निवडणूक  पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या.नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरत आहे. आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही. सर्वांनी विनंती आहे भावनिक होऊ नका. आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा. आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी उभे राहा. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देईल त्यला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील.मतीमधून आपली ताकद दाखवा

Post a Comment

0 Comments