सोलापूर | बिलाची पावती देण्यासाठी मागितली १० हजार रूपयाची लाच, लिपिकाला रंगेहात पकडले


शासकीय नियमांप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी १० हजार रूपयाची लाच स्विकारताना, महापालिकेतील कनिष्ठ लिपीकाला रंगेहात पकाडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोपाळ सावरय्या मंदोल्लू (वय ४५ रा. जय प्लाझा अपार्टमेंट, होटगी रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार हा एक ठेकेदार असून त्यांना ई-निवीदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालयातील ए.सी. (एअर कंडिशन मशीन) बसविण्याचे काम मिळाले होते. ई-निवीदे प्रमाणे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाचे बील मंजूर होवून मिळाले होते. तक्रारदार कामाच्या बीलाची पावती मिळण्यासाठी मुख्यलेखापाल कार्यालयातील धनादेश विभागातील कनिष्ठ लिपीक गोपाळ मंदोल्लू यांच्याकडे पाठपुरावा करत होते.

Post a Comment

0 Comments