मुंबई |
माझ्या बाबांपेक्षा मला 10 पट संघर्ष करावा लागला. पण, 10 वर्षानंतर मी तुमच्यासमोर उभी आहे, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आजचा शेवटचा दिवस आहे.
नाशिकमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी बाबा बाबा केलं तर पोटात का दुखतं? : पंकजा मुंडे
आम्ही कधीही कुठेही जाऊन योगदान द्यायला तयार आहोत. त्या मंत्री झाल्या त्याचा मला आनंद झाला. त्यांच्या लढाईला यश आलं, त्यामुळे मला आनंद झाला. भारतीताई आमची बहीण आहे, तिला मोठ्या मतांनी निवडून द्या. जीन्स पॅन्टवाला पण शेतकरी असावा, टोपीवाले पण शेतकरी आहेत, टोपी नसलेले पण शेतकरी आहे. गोपीनाथ मुंडे म्हणून माझी ओळख, माझ्या बाबांचे नाव सगळे घेतात मी तर पोटी आलीय. बाबा बाबा केलं तर काय पोटात दुखतं? बाबांपेक्षा मला 10 पट संघर्ष करावा लागला. दहा वर्षे संघर्षानंतर मी उभी असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
0 Comments