खासदार नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या - चेअरमन रणजितसिंह शिंदे


माढा - पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा भोसे येथील अक्षता मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आगामी काळातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला व या मेळाव्यास माझ्यासह आमदार बबनदादा शिंदे साहेब यांनी येणाऱ्या काळातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संवाद साधला. तसेच मा. खासदार साहेबाऺनी माढा - पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी नेहमीच मदत व सहकार्य केलेले आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.

यावेळी खासदार साहेबाऺनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना केंद्र सरकारच्या विविध योजनाऺची माहिती दिली व सर्वांनी कमळ या चिन्हाला मतदान करून भरपूर मतांनी निवडून द्यावे अशी विनंती केली.

प्रसंगी माढा लोकसभेचे उमेदवार मा.खा.श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. बबनदादा शिंदे, मोहन अण्णा कोळेकर, वामनराव माने, बंडू नाना ढवळे, सुभाष माने सर, नरसाअप्पा देशमुख, राहुल पुरवत, बाळासाहेब देशमुख, आदिनाथ देशमुख, बाळासाहेब शिंगटे, ज्ञानदेव ढोबळे, प्रेम चव्हाण, सत्यवान करांडे, अभिजीत कवडे, राजाराम दाजी भिंगारे, नारायण देशमुख, अभिषेक पुरवत, नितीन खटके, दशरथ खळगे, पोपट मामा चव्हाण, दिलीप चव्हाण, नागनाथ माळी, दिनकर बापू कदम यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments