मुंबई |
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रचार सभांमधून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी फडणवीस यांना इशारा देत पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार का? यावर राऊत म्हणाले की, या प्रश्नावर आमचं सरकार येऊ द्या मग बघा, असं म्हणत राऊत यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे. पुढे ते म्हणाले की, फडणवीस यांनी फोन टॅपिंग केलं आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काही काळात खोटं बोलणारी पिढी निर्माण केली आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील नेम धरला. राऊत म्हणाले की, अदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. आदित्य ठाकरे यांना पैसे सापडले होते. आणि जो आरोप केला आहे तो खरा आहे. एकनाथ शिंदे यांना धमकावलं आणि ते #@xला पाय लावून पळून गेले, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार घणाघात केला आहे.
4 जूननंतर मोदी पदावर नसतील-
संजय राऊत म्हणाले की, तु्म्ही म्हणता की उद्धव ठाकरे यांनी रंग बदलले पण तुम्ही काय बदललं काय @x# बदलली का? यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा बेडरपणा हा गुण घेतला नाही, असं राऊत म्हणाले. पुढे राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे एक नंबरचे डरपोक आहेत. मोदी हे अपघाताने पंतप्रधान झाले आहेत. 4 जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
राहुल गांधींशी तुलना करताय?
संजय राऊत म्हणाले, तुम्ही म्हणत होते की, राहुल गांधीशी तुलना होऊ शकत नाही. मात्र, त्याच राहुल गांधींशी आता तुम्ही तुलना करताय? नरेंद्र मोदी मुंबईत सात सभा घेतायेत. महाराष्ट्रात एक दिवसाआड येत आहेत. कारण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचा धसका आहे. हे व्यापारी लोक आहेत यांना फक्त प्रॉफिट आणि लॉस कळतो, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
0 Comments