अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते- पाटलांचा पुष्पगुच्छ फडणवीसांनी स्विकारला नाही


अकलूज |

माढा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर मोहिते-पाटलांनी भाजपविरोधात बंड पुकारत 'तुतारी' हाती घेतली. धैर्यशील मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे.

पण, विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्येच आहेत. त्यातच मोहिते-पाटलांच्या अकलूज या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. सभेपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आले होते. मात्र, फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या पुष्पगुच्छाचा स्वीकार केला नाही.

धैर्यशील मोहिते-पाटील माढ्यातून लढण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलं. भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर जयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढ्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्जही भरला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना मोहिते-पाटील कुटुंबीयांमध्येही मतभेद होते, हे तेव्हाही दिसून येत होते.

Post a Comment

0 Comments