दिनेश कार्तिकचा अनोखा विक्रम असे केले तिहेरी शतकमुंबई |

आयपीएलचा धमका सुरु आहे. आयपीएलमध्ये रोज नवीन नवीन विक्रम होत आहे. टी 20 क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिक याच्या नावावर अनोखा विक्रम झाला आहे. यष्टीरक्षक अन् फलंदाज असणाऱ्या दिनेश कार्तिक याने टी 20 क्रिकेटमध्ये इतिहास निर्माण केला आहे.

एकाच देशात 300 टी 20 सामने खेळण्याचा विक्रम कार्तिक याच्या नावावर जमा झाला आहे. जगात टी 20 क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त सामने खेळणारे खेळाडू आहेत. परंतु एकाच देशात 300 सामने आता फक्त दिनेश कार्तिक याच्या नावावर झाले आहेत. हे सर्व सामने दिनेश कार्तिक भारतात खेळला आहे. लखनऊ विरुद्ध खेळताना दिनेश कार्तिकच्या नावावर हा विक्रम जमा झाला.

Post a Comment

0 Comments