प्रत्येक वेळी माझा बाप मारला, अरे काय लावलय काय? ओमराजेवर तानाजी सावंत यांची टीकाबार्शी |

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर  आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत  यांच्या गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका टिप्पणी सुरु आहे.

आज धाराशिव लोकसभा महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शी, सोलापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? लोकांनी तुला निवडून दिलं, पण तू आता लोकांचा बाप का मारायला निघाला? असा घणाघात त्यांनी केला आहे. 

तानाजी सावंत म्हणाले की, आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आणि कडवट शिवसैनिक राहणारच आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं होतं की, तानाजी सावंत तुम्हीच इथला खासदार निवडून आणायचा आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने आता मी माजी म्हणतो खासदार निवडून आणला. प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय हे? अशी टीका त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली. 

Post a Comment

0 Comments