पंकजा मुंडेंना दाखवले काळे झेंडे, १० जणांवर गुन्हा दाखलबीड |

बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर मुंडे यांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. पंकजा मुंडे आज (दि.२३) बीड जिल्हा दौऱ्यावरती होत्या.


क्षेत्र संस्था नारायण गड येथे त्या दर्शनाला आल्या. त्यानंतर दर्शन घेऊन गेवराईकडे जात असताना बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवले. शिवाय निषेध नोंदवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्या. दरम्यान, आचारसंहिता आणि जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे जवळपास दहा मराठा आंदोलकांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments