उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता


बार्शी |

लोकसभा च्या निवडणुकीचे आचारसंहिता जाहीर झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून महायुतीकडून अजूनही त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाही त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अनेक जणांची नावे चर्चिली जात असून त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी प्रवीण सिंह परदेशी सुरेश ( दाजी) बिराजदार धनाजी सावंत आरोग्य मंत्री तानाजी सावंत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी खासदार रवींद्र गायकवाड औश्याचे आमदार अभिमन्यू पवार काही दिवसापूर्वीच काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले उमरग्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

खरंतर महायुतीतून लोकसभेची जागा कोणाला सुटणार हेच अजून निश्चित नाही या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे विधानसभेचे ५ आमदार आहेत, जर जागा भाजपाला सुटली तर दहा उमेदवार इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटली तर सुरेश बिराजदार यांच्याबरोबर आमदार विक्रम काळे यांचेही नाव चर्चेत आहे आणि जर ही जागा शिवसेनेला सुटली तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचेही नाव उमेदवारीबाबत चर्चेत आहेत त्याचबरोबर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा पत्रकार परिषदेतून काही दिवसापूर्वी व्यक्त केली आहे एवढे इच्छुक महायुती कडे असतानाही अजूनही लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर होत नाही.

Post a Comment

0 Comments