सोलापूर |
दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथे राहत्या घरी पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.संजय हिरोळे असे आरोपी पतीचे नाव असून,त्याने पत्नी रेखा संजय हिरोळे वय 32 वर्ष हिचा गुरुवार,दि.1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास केबल वायरने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे.आश्चऱ्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर स्वतः संजय हिरोळे वळसंघ पोलिसांसमोर हजर झाला.संजय आणि रेखा यांचे लग्न पंधरा वर्षांपूर्वी झाले होते.त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.संजयला दारूचे व्यसन होते आणि सतत पत्नी व पत्नीच्या घरच्यांनी लोकांकडे पैशाची मागणी करत होता.अशी माहिती नातेवाईक व ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले असून हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
0 Comments