नाट्यसम्राट अशोक सराफ याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीरमुंबई - अशी ही बनवा बनवी चित्रपटातील कधीही न विसरता येणारे पात्र धनंजय माने आणि अभिनयाचे सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. "व्याख्या विख्खी वुख्खू" या आणि अशा कित्येक विनोदी लकबींमधून अशोक सराफ यांनी मराठी माणसाच्या तीन पिढ्यांना खळखळून हसवलं. "७० रुपये वारले" असे अनेक संवाद त्यांच्या अभिनयातून अजरामर झाले. 

हमिदाबाईची कोठी ते आत्ताचं व्हॅक्युम क्लीनर अशा अनेक नाटकांतून; भुताचा भाऊ, वजीर, धूमधडाका, चौकट राजा, अशी ही बनवा बनवी, गोंधळात गोंधळ अशा मराठी चित्रपटांमधून; येस बॉस, करण अर्जुन, सिंघम अशा बॉलीवूड चित्रपटांतून त्यांनी रसिकांना भरभरून दिलं. पूर्वी म्हणजे जेव्हा केबल घराघरात पोहोचली नव्हती त्याकाळी सह्याद्रीवर दर शनिवार-रविवारी लागणारे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सदाबहार चित्रपट हे मराठी माणसाच्या मनोरंजनाचं मुख्य साधन असायचं.

३०० हून अधिक चित्रपट करणाऱ्या अशोक सराफ यांनी मराठी रसिकमनांवर अशाप्रकारे अधिराज्य गाजवलं की ते प्रत्येक घराघरातलेच एक सदस्य होऊन गेले. सगळे रसिक प्रेक्षक त्यांना प्रेमाने "अशोकमामा" म्हणू लागले. 
अशा अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर होणं ही जगभरातील मराठी रसिकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.    
        

Post a Comment

0 Comments