कपिलापुरीमध्ये राम विजय महामंत्र १०८ पठण


( संपूर्ण गावात महाप्रसाद वाटप )

[ प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटनानिमित्ताने संपूर्ण देशात सण साजरा होत आहे.खूप मोठा आनंदोत्सव साजरा होत आहे.
-अँड रणजीत महादेव पाटील. ]

परंडा प्रतिनिधी - 

राम मंदिर हे अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्री राम यांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते.श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटन कार्यक्रम निमित्ताने अयोध्या येथून कपिलापुरी येथे आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरीत करण्याचा उपक्रम करण्यात आला. २२ जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले गेले आहे.या पार्श्वभूमीवर कपिलापुरी येथे हनुमान मंदिरामध्ये श्रीराम प्रतिमा पूजन करण्यात आले,तसेच श्रीराम विजय महामंत्र १०८ पठण करण्यात आले.तसेच रामलला प्राणप्रतिष्ठा हा मंगल दिनाचे अवचित साधून अदिती रणजीत पाटील हिच्या द्वितीय वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थीना पेन वाटप करण्यात आले.
अयोध्या नगरी मध्ये भव्य मंदिर व प्राणप्रतिष्ठा होत असलेला आनंदोत्सव साजरा करून संपूर्ण गावामध्ये महाप्रसाद वाटप करण्यात आले.याप्रसंगी रणजीतकुमार जैन,वैभव आवाने,जयघोष आवाने,बाहुबली मसलकर,सुजित पाटील,समाधान कुंभार,विलास भोसले,नितीन शिंदे,अक्षय कुंभार,तुषार टेम्बे,संदीप कुंभार,सतीश उद्घघाले,श्रीमंतराजे प्रतिष्ठाण अध्यक्ष रणजीत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments