भारत हा युवकांचा देश कि बेरोजगार युवकांचा...?


✍️ स्वराज पाटील, लातूर

भारत हा जगाच्या पाठीवर युवकांचा देश म्हणून ओळखला जातोय. भारत सरकार १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातोय. परंतु आज या युवकांच्या देशातील युवकांची काय अवस्था आहे ?  एकिकडे या भारतात वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा आध्यात्मिक ग्रंथ लिहिणारे माऊली, इ स १५ व्या शतकात वयाच्या १६व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या ३० व्या वर्षी शिकागो येथील धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारे स्वामी विवेकानंद, भारत स्वतंत्र लढ्यात वयाच्या १० व्या वर्षी  इंग्रज अधिकार्‍यांच्या वाहनाच्या समोर येऊन आपले जीवन संपवीनारे बाबु गेणू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक युवकांचा इतिहास आपल्या भारताला आहे. मात्र आजच्या युवकांचे भविष्य मात्र अंधारात आहे. भारतात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या ३०% लोकसंख्या ही युवकांची आहे. 
             
युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात युवकांची आज मात्र दैनी अवस्था झाली आहे. सुजलाम सुफलाम देशातील युवक बेरोजगारीच्या गळाला अडकले जात आहे.  देशातील सरकार युवकांच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात व्यस्त झाले आहे. भारतातील अनेक संस्था (ग्रहविभाग, वायु दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पाणीपुरवठा विभाग, इ.) मध्ये अनेक पदे रिक्त असताना वर्षातुन आवश्यकतेपेक्षा १० - १५% पदाची भरती करत आहे आणि ही भरती खुप स्पर्धात्मक करुन युवकांना बेरोजगारीच्या खानीमध्ये ढकलत आहे. सरकारी नोकरी साठी (MPSC, UPSC)  चा अभ्यास करणार्‍या युवकांचे दिवसेन दिवस वयोमर्यादा वाढत चालली आहे. मग या देशात स्पर्धा परीक्षा न करता SET, NET, PHD, यांचा अभ्यास करणार्‍या युवकांनाही आवश्यक अशी सरकार मदत करताना दिसत नाही. 
       
 एकेकाळी भारताचे राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम युवकाच्या जोरावर भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न पहात होते आणि आज देशात सरकार १.५ जीबी दिवसाला इंटर्नल देऊन युवकांना सोशल मीडियावर गुंतवून ठेवत आहे. यामुळे देशातील युवकांमध्ये बौद्धीक तानतनाव वाढत आहे आणि यातून दिवसेंदिवस युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि आत्महत्या वाढत आहेत. मध्यंतरी महाराष्ट्र विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून त्याच्या मतदार संघात स्वतंत्र 'एमआयडीसी' तयार व्हावी म्हणून अनेक वेळा विधानसभेत प्रश्न उपस्थित केले परंतु या प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दूर्लक्ष केले  जातेय यामुळे भारतातील सरकारला युवकांना बेरोजगारीच्या दरीत ढकलून मोकळे होत आहेत यात तिळमात्र शंका नाही. एकिकडे भारताची ओळख युवकांचा देश म्हणून असताना दुसरीकडे मात्र या युवकांना बेरोजगारीचे दिवसेंदिवस संकट वाढत आहे. यामुळे हा देश युवकांचा कि बेरोजगार युवकांचा अस प्रश्न मनात नेहमी निर्माण होत आहे. 

 

Post a Comment

0 Comments