भगवंत सेना दलाच्या तत्पुरतेमुळे दोन इसमांचे वाचले प्राण!


शेरू सय्यद वय वर्षे 28, रहाणार धारूर व फिरोज सय्यद वय वर्षे 31, सध्या रहाणार चव्हाण प्लॉट, उपळाई रोड, बार्शी हे दोघे सख्खे भाऊ गॅस सिलेंडर टाकी आणण्यासाठी लक्ष्याचीवाडी येथील मोहिते गॅस एजन्सीच्या गोडाऊनकडे जात असताना,  बार्शी परांडा रोडवर लक्ष्याच्या वाढीच्या पुढील बाजूस मोहिते गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोर, पॅशन प्रो या दुचाकी गाडीला,  एका एम. एच. 04, 8786 या नंबर च्या स्वीफ्ट डिझायर चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने, दुकाचीवरील दोन्ही इसम गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. रस्त्यावरून इजा करणारे प्रवासी फक्त बघ्याची भूमिका घेत होते.

यावेळी भगवंत सेना दलाचे सदस्य स्वप्निल पवार आणि मुनवर सय्यद हे घटनास्थळी पोचून, जखमींना तात्काळ दादा बोरकर, सौरभ ढोरे, ज्ञानेश्वर जानकर, बुद्धीवान ढोरे यांच्या साह्याने बार्शीतील डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी भगवंत सेना दलाचे सेना दल प्रमुख धीरज शेळके यांनी तात्काळ तालुका पोलीस स्टेशनला संपर्क करून सदरील घटनेची माहिती सांगितली. तसेच सदरील जखमी इसमांची नावे विचारून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करून तात्काळ हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. जखमींपैकी शेरू सय्यद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती अस्थिर असून, फिरोज सय्यद यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 गेल्या पाच महिन्यापासून भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आतापर्यंत 23 अपघातग्रस्तांना तातडीची मदत करून भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आतापर्यंत 23 जणांचे प्राण वाचवण्यात यश असून, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी 9922914009 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भगवंत सेना दल प्रमुख धीरज शेळके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments