बार्शी | मित्रासोबत पोहायला गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यूबार्शी |

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे विहिरीमध्ये पोहायला गेलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संकेत महादेव पिंगळे वय १७ रा. लाक्की बुक्की ता. परांडा जि. धाराशिव मयत मुलाचे नाव आहे.

 संकेत हा इयत्ता बारावी मध्ये बार्शीमध्ये शिक्षण घेत होता. तो आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी गेला असता हि दुर्दैवी घटना घडली आहे. बार्शी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घेटनेचा पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरवसे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments